yuva MAharashtra सांगलीत होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र

सांगलीत होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र

सांगली टाईम्स
By -
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी चर्चा करताना जनसुराज्य पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सामित कदम.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सकारात्मक; जनसुराज्यचे समित कदम यांना ग्वाही ; लवकरच निर्णय शक्य

सांगली / प्रतिनिधी
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठातचे सांगलीत विजयनगर येथे उपकेंद्र व्हावे अशी आग्रही मागणी जनसुराज्य पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. याबाबत १७ रोजी विद्यापिठाच्या कुलगुरूंची चर्चा करू, लवकरच निर्णय घेवू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. दरम्यान कवलापूर विमानतळ तसेच अन्य प्रश्नही मार्गी लावू असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितल्याचे कदम म्हणाले.
कदम म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, कवलापूर विमानतळ सह अन्य प्रश्नाबाबत राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेतली. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत झाल्यास सांगली, मिरज, कवठेमंकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव, आटपाडी या तालुक्यांतील विद्यार्थांना होईल. सांगलीत विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीच्या मागे शासनाची जागा आहे. या जागेवरच उपकेंद्र व्हावे अशी आग्रही मागणी केली. 
दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंशी याबाबत १७ तारखेच्या बैठकीत चर्चा करू. सकारात्मक निर्णय लवकरच घेवू अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, याशिवाय कवलापूर विमानतळ प्रश्नाबाबतही ते सकारात्मक आहेत. जिल्ह्यातील अन्य विकासात्मक बाबी, प्रश्नावरही त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे कदम यांनी सांगितले.