yuva MAharashtra विठ्ठल चव्हाण यांना 'क्रांतिवीर वड्डे ओबांना समाज गौरव' पुरस्कार

विठ्ठल चव्हाण यांना 'क्रांतिवीर वड्डे ओबांना समाज गौरव' पुरस्कार

सांगली टाईम्स
By -


९ फेब्रुवारीला होणार मंगळवेढा येथे वितरण ; अनेक मान्यवर राहणार उपस्थित राहणार

सांगली / प्रतिनिधी

तासगाव येथील दैनिक पुढारीचे जेष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण यांना अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाच्या वतीने देण्यात येणार प्रतिष्ठतेचा राज्यस्तरीय "क्रांतिवीर वड्डे ओबांना समाज गौरव" पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार दि, ९ फेब्रुवारी रोजी मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे अनेक मान्यवराचे हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

आंध्र प्रदेश येथील रायलसीमा येथील क्रांतीवीर वड्डे ओबांना यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरोधात स्वतंत्र  पूर्व लढयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या नावाने अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार अत्यंत महत्वाचाआणि प्रतिष्ठतेचा मनाला जातो. क्रांतिवीर वड्डे ओबांना याचे स्वतंत्र पूर्व लढ्यातील योगदान त्याच्या वर असणाऱ्या सेनाधिकारी याच्या जबाबदारीने  त्यांनी अनेकांना संरक्षण दिले. त्याच स्वतंत्र पूर्व लढ्यातील योगदान समाजाला प्रेरणा दायी आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या लढयात क्रांतिवीर वड्डे ओबांना यांनी सेनाधिकारी म्हणून भूमिका बजावताना त्यांनी वापरलेली रणनीती वाखाणण्याजोगी होती.

या महान क्रातीविराच्या  नावे देण्यात येणारा " अखिल भारतीय वडार बोली साहित्य जीवन गौरव पुरस्कार" हा अत्यत प्रतिष्ठतेचा समजला जातो.  या पुरस्काराचे मानकरी विठ्ठल चव्हाण हे महाराष्ट्र राज्यातील वडार समाजाचे पहिले  "पत्रकार " ठरले आहेत. त्यांनी गेल्या ३४ वर्षांच्या काळात काम करीत असताना अनेकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. गेली ३४ वर्षे ते तासगाव सारख्या अतिसंवेदनशील तालुक्यात निर्भीडपणे वृत्त संकलनाचे काम करीत आहेत.