yuva MAharashtra सांगलीत भाजपचे घर टू घर सदस्य नोंदणी अभियान

सांगलीत भाजपचे घर टू घर सदस्य नोंदणी अभियान

सांगली टाईम्स
By -

भाजप सदस्य नोंदणी अभियान प्रसंगी भाजप भटक्या व विमुक्त सेलचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार व त्यांचे कार्यकर्ते.
भाजप भटक्या व विमुक्त जाती मोर्चाचे सूरज पवार यांचा पुढाकार

सांगली / प्रतिनिधी
देशभरात भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. सांगलीतील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा भटक्या व विमुक्त मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार घर टू घर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. सांगली शहरातून किमान ७० हजारांवर सदस्य नोंदणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. लोकशाही मानणारा पक्ष आहे. सर्व जाती, धर्मांना सोबत घेवून 'सबका साथ, साबका विकास' करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगलीत विकासाची गंगा आणली आहे. रविवार पासून देशभरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानास सुरवात झाली आहे. 
सांगलीतील या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः भाजपाकडे तरुणांचा मोठा ओढा आहे. सांगलीत घर टू घर सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. जवळपास किमान ७० हजारांवर सदस्य नोंदणी होईल असेही पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते म्हणाले सदस्य नोंदणी बरोबरच केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न, मार्गदर्शन केले जात आहे.