विटा येथे ३० कोटींची एमडी ड्रॅगचा साठा जप्त
सांगली / प्रतिनिधी
नशेची इंजेक्शन आणि गोळ्या विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढणाऱ्या सांगली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री विटा जवळ असणाऱ्या कार्वे एमआयडीसी येथील 'राम कृष्ण हरी माऊली' या कारखान्यावर छापा मारत तब्बल ३० कोटी रुपयांचे एमडी ड्रगचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी रहुदिप धानजी बोरिचा( वय ४१ वर्ष, रा. श्री रेसेडेन्सी, ररुम नं २२, उत्तीयादरा कोसंबा, ता.भरुच, जि. सुरत राज्य गुजरात), सुलेमान जोहर शेख (वय ३२ वर्ष, रा. गौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट मुंबई), बलराज अमर कातारी (वय २४ वर्ष, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेज जवळ, विटा) या तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सागर टिंगरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, " विटा हद्दीतील कार्वे एम आय डी सी, रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा चार चाकी वाहनातून मेफॅड्रॉन (एम.डी) नावचे अंमली पदार्थ विक्री करीता घेवून जाणार आहे." पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना त्यांनी याबाबत माहिती दिली. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाने सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार व त्यांचे पोलीस अंमलदार यांनी विटा एमआयडीसीत सापळा रचला त्यावेळी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पत्र्याचे गेट मधून एक सशंयीत पांढरे रंगांची झुंडाई आय २० तिचा आरटीओ क्रमांक एमएच ४३ ए एन १८११ चार चाकी वाहन थांबवून त्या वाहनांमधून रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेफॅड्रॉन (एम.डी) नावचा अमंली पदार्थ प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरुन ते बनविण्याकरीता वापरलेले साहित्य मिळुन आले.
यातील रहुदिप बोरिचा हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे बीएससी केमेस्ट्री शिक्षण झाले असुन त्यास केमीकल प्रॉडक्शन बाबत चांगली माहिती आहे. तसेच गेले सुमारे १ महिन्यापासुन तो बलराज कातारी व सुलेमान शेख यांनी सदरची रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज ही (रा. पाटील वस्ती, विटा यांचे कार्वे, ता. खानापुर जि. सांगली) गावचे हद्दीत असले प्लॉट नंबर ४३ मधील कारखाना त्यांचेकडुन ३०,०००/- रु प्रति महिना देवुन भाडयाने घेतला असुन त्याबाबत त्यांचेत अद्याप कोणताही करार झालेला नाही.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उप.वि.पो.अधिक्षक विभाग, तासगांव सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ. शाखा, सतिश शिंदे, विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, स्था.गु.अ. शाखेकडील सपोनि पंकज पवार, सिकंदर वर्धन, सपोफौ अच्युत सुर्यवंशी, सागर टिंगरे, संदीप गुरव, अमोल पैदाळे, नागेश खरात, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, अनिल कोळेकर, उदय साळुंखे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे, संजय पाटील, अगर नरळे, सतिश माने, महादेव नागणे पोना- संदीप नलवडे, उदय माळी, अनंत कुडाळकरपोकॉ विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, गणेश शिंदे, वनिता चव्हाण, सायबर कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाई सहभाग घेतला.
.jpg)
