
कवठेमहांकाळ : यशस्विनी गौरव अंकाच्या प्रकाशन करताना सांगली जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे. बाजूस अन्य महिला पदाधिकारी.
श्री अंबिका महिला मंच चा उपक्रम : महिला मेळावा व हळदी - कुंकू कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद
कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
येथील श्री अंबिका महिला मंच तर्फे खास महिलांसाठी महिला मेळावा, हळदी - कुंकू व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. श्री अंबिका महिला मंच हे सौ. शितल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली गेली १० वर्षे महिलांसाठी कार्य करीत आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विविध उपक्रम राबवित आहे. समाजातील महिलांना एक हक्काच व्यासपीठ मिळावे म्हणून श्री अंबिका महिला मंच हे अविरतपणे कार्य करत असते. समाजामध्ये अनेक महिला आहेत, ज्यांनी खडतर प्रवास करून स्वतःला घडविले आहे, अशा महिलांना आपला जीवनप्रवास मांडता यावा यासाठी श्री अंबिका महिला मंच ने त्या महिलांना ' यशस्विनी' या गौरव अंकामध्ये जीवनप्रवास मांडण्याची संधी श्री अंबिका महिला मंचच्या अध्यक्षा सौ. शितल गुरव यांनी उपलब्ध करून दिली आहे.
या ' यशस्विनी ' या गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच महिलांसाठी महिला मेळावा व हळदी- कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.महिलांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री अंबिका मंचच्या अध्यक्षा सौ. शितल गुरव मॅडम यांनी केले. सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री अंबिका महिला मंच च्या अध्यक्षा शितल गुरव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या प्रस्ताविकांमध्ये अंबिका महिला मंच च्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच अंबिका महिला मंच चे कार्य आज लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचले आहे त्याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर प्रत्येक महिलेला प्रेरणा मिळावी हि संकल्पना लक्षात घेऊन यशस्विनी या गौरव अंकाची निर्मिती केली असे त्यांनी वक्तव्य केले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
तसेच यशस्विनी या गौरव अंकामध्ये ज्या यशस्वी महिलांचे लेख आहेत अशा सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये साधनाताई कांबळे-धेंडे, सिंधुताई गावडे, सुरेखा कोळेकर, अनिता खाडे, स्मिता पाटील, रेश्मा पाटील, वत्सला पाटील, सुलोचना माने, स्वाती कोरे, डॉ. सुवर्णा जाधव, रंजना टोने, अपर्णा साळुंखे-पाटील, पवित्राताई खोत, शारदा पाटील, विद्या पवार,सुरेखा कांबळे, भारती खोत, रंजना शेळके, स्नेहल खराडे,अर्चना माने-पाटील,पुनम माने,सुवर्णा तेली, शारदा सदामते, डॉ.स्मिता इरळे, शारदा माणिक पाटील,वैशाली सगरे,डॉ. शकुंतला म्हेत्रे ,डॉ. शैला कोरे, संजना शेळके, डॉ. हर्षला कदम, सुशीला कोळेकर, सखुबाई शेळके, उषा इरळे, आशा पाटील- कोडग या यशस्वी महिलांचा समावेश होता.त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व बचत गटांचे सन्मान करण्यात आले.या कार्यक्रमास जिल्हा परिषद सांगली च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे उपस्थित होत्या, त्यांना समाजामध्ये महिला अग्रेसर कशा ठरू शकतात त्याबद्दल माहिती दिली. तसेच महिलांनी पुढे येऊन कशाप्रकारे कार्य केले पाहिजे त्याबद्दल माहिती दिली.
तसेच जिल्हा परिषद सांगली च्या माजी अध्यक्षा मालन मोहिते या हि उपस्थित होत्या. त्यांनी अंबिका महिला मंच च्या उपक्रमाचे कौतुक केले. व शितल गुरव यांनी जो उपक्रम राबविला आहे त्यांच्या या उपक्रमामुळे महिलांना एक हक्काचं एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे असेही त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हंटले. तसेच माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद सांगली च्या छाया खरमाटे या हि उपस्थित होत्या, त्यांनी आज समाजातील स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कशाप्रकारे पुढे जात आहेत याबद्दल माहिती दिली.तसेच माजी महापौर संगीता खोत यांनी शितल गुरव यांनी राबविलेल्या हा उपक्रम अनेक महिलांना कशाप्रकारे प्रेरणादायी ठरू शकतो याबद्दल सांगितले. तसेच शिवानी पाटील यांनी महिलांनी कशाप्रकारे समाजात उभा राहिले पाहिजे याबद्दल माहिती दिली.
![]() |
| ADVT. |
या कार्यक्रमास नगरसेविका शितल पाटील, कुसुमताई कोळेकर,श्री अंबिका शिक्षण संस्थेचे सचिव वैभव गुरव, विजया गुरव, राजश्री पाटील, उज्वला बोबडे, श्री बाळासाहेब गुरव (बापू) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कवठेमहांकाळ चे मुख्याध्यापक श्री सी. बी. घाटे , एम्स चे मुख्याध्यापक व्ही. व्ही. पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री बाळासाहेब गुरव (बापू) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कवठेमहांकाळ व एम्स स्कूल कवठेमहांकाळ, तसेच सर्व अंबिका महिला मंच सदस्या तसेच अनेक महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन जाधव, अपर्णा मोरे व स्वाती कुलकर्णी यांनी केले तर आभार हसीना मुजावर यांनी मानले.
.jpg)