![]() |
| राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करताना आमदार गोपीचंद पडळकर. बाजूस आमदार सदाभाऊ खोत आदी. |
आमदार गोपीचंद पडळकर; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी
सांगली / प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, राज्यातील विद्यापीठांमध्ये "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र" सुरु करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे. पडळकर यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्री पाटील यांची भेट घेतली. विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन स्थापन करण्याचे उद्दिष्टः
नेतृत्व व प्रशासन : अहिल्यादेवींच्या नेतृत्वगुणांचा आणि लोककल्याणकारी शासनपद्धतीचा अभ्यास करणे.
धार्मिक कार्य : अहिल्यादेविंनी हिंदू धर्मासाठी केलेल्या कार्याचा अभ्यास व संशोधन व्हावे.
समाजसुधारणा : विद्यार्थ्यांना अहिल्याबाईच्या सामाजिक सुधारणांमधील योगदानातून प्रेरणा देणे.
संशोधन प्रोत्साहन : महिलांचे सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि न्यायमूल्यांवरील संशोधनाला प्रोत्साहन देणे.
शैक्षणिक प्रकल्प : त्यांच्या जीवनावर आधारित अभ्यासक्रम, परिसंवाद आणि संशोधन प्रकल्प राबविणे.
![]() |
| ADVT. |
या अध्यासन केंद्रामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या अद्वितीय नेतृत्वाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे व त्यांच्या विचारांना समाजात दृढ करण्यासाठी मोलाचे योगदान मिळेल. या केंद्रांद्वारे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यावर संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे त्यांच्या अमूल्य योगदानाचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. याबरोबरच त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि नवीन पिढ्यांना प्रेरणा देण्यास मदत होईल असे आमदार पडळकर म्हणाले.

.jpg)