yuva MAharashtra शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत जाहीर करा

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत जाहीर करा

सांगली टाईम्स
By -

 

- शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाची मागणी
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेली निदर्शने.

सांगली / प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी यासह अन्य मागण्या शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून करण्यात आल्या. याबाबत पक्षाचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चात वाढ, महागडी खते, औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये इतकी थेट आर्थिक मदत त्वरीत जाहीर करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे, पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथील करुन पंचनाम्याची प्रक्रि या बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरीत देण्यात यावा, आदी मागण्या यावेळी केल्या आहेत.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत, महादेव मगदूम, तानाजी सातपुते, विष्णूअप्पा पाटील, प्रताप विचारे, संतोष पाटील, मयूर घोडके, विराज बुटले, महादेव हुलवान, बाळासाहेब हत्तेकर, शकीरा जमादार, विठ्ठल संकपाळ, भगवानदास केंगार, लक्ष्मण वडार, महेश लोंढे, पांडू लोहार, प्रशांत माने, आनंद राजपूत, राम काळे, रमेश गडदे, प्रभाकर गोरे, किरण पवार, कुबेरसिंग राजपूत, अब्दुल मोमीन, लखन भोरवत, अफसर नदाफ, बबन गायकवाड, सनी कोरे, नंदू कदम, रोहन कोळी, शुभम उपाध्ये, कुंदनसिंग राजपूत, आर. आर. पाटील, विठ्ठल हुलवान, चंद्रकांत व्हर्कल, मुन्नाभाई शेख, किरण कांबळे आदी उपस्थित होते.

Tags: