yuva MAharashtra काडसिद्धेश्वर स्वामीजी उलगडणार "समरसतेचा पुण्यप्रवाह"

काडसिद्धेश्वर स्वामीजी उलगडणार "समरसतेचा पुण्यप्रवाह"

सांगली टाईम्स
By -

 

श्री श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी

- भारतीय विचार साधनाच्या ' हिंदुत्व ' पुस्तकांचे प्रकाशन

सांगली / प्रतिनिधी

"हिंदुत्व : समरसतेचा पुण्यप्रवाह" या विषयावर कणेरी मठाचे जगदगुरु श्री श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांचे प्रवचन सांगलीत संपन्न होणार आहे. 

भारतीय विचार साधनाच्या वतीने डॉ. मोहनजी भागवत, डॉ. कृष्ण गोपालजी, मा. दत्तात्रयजी होसबाळे, मा. भैय्याजी जोशी, मा. सुरेशजी सोनी, मा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या व्याख्यानाचे संकलन असणाऱ्या " हिंदुत्व - हिंदुराष्ट्र विकासपथ " आणि  " हिंदुत्व- सामाजिक समरसता " या दोन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या मंगलहस्ते बुधवार (दिनांक ८ ) रोजी सायंकाळी ६ वाजता वेलणकर सभागृह, विलिंग्डन महाविद्यालय , सांगली येथे संपन्न होत आहे. 

हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून सामाजिक विकासदृष्टी आणि हिंदुराष्ट्राची अवधारणा याची विस्तृत चर्चा 'हिंदुत्व - हिंदुराष्ट्र विकासपथ' या पुस्तकात केली आहे. भारतात जन्माला आलेल्या बौद्ध, जैन, वीरशैव, शीख आदी पंथातील समान सूत्रे त्यातील समरसतेचा विचार प्रकट करतात त्याच अनुषंगाने   " हिंदुत्व- सामाजिक समरसता " या पुस्तकात विस्तृत मांडणी केली आहे. हिंदू परंपरेतील समरसतेचा विचार , त्याची समाजबांधणीतील भूमिका आणि समाजाच्या ऐक्यासाठी त्याचे अनुपालन कसे करावे याविषयी प. पू. काडसिध्देश्वर स्वामीजी यांचे प्रवचन आयोजित केले आहे.

Tags: