- आमदार गोपीचंद पडळकर
- जयंत पाटील यांच्या बाबतीत वक्तव्यावर ठाम
सांगली । प्रतिनिधी
देशाचे पंतपधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबाबात ज्या वेळी आक्षेपार्ह विधाने झाली त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना फोन केले होते का? असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंड पडळकर यांनी विचारला आहे. दरम्यान या संदर्भात मुख्यमं फडणवीस यांचा फोन आला होता. त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत अशी सूचना केली आहे. त्यांच्या सूचनांचे मी पालन करेन असेही आमदार पडळकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमीत्त आमदार पडळकर आले होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करुन नाराजी व्यक्त केली आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांच्या आई संदर्भात आक्षेपार्ह विधान केले.
काही दिवसांपूर्वी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईसोबत आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. या वेळी पवार यांनी मोदी, फडणवीस यांना फोन केले होते का असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, याबाबत माफी मागण्याचा प्रश्न नाही. योग्य वेळी बोेलेण. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. अशी वक्तव्ये करु नका अशा पध्दतीची सूचना त्यांनी मला दिली आहे. मी त्या सूचनांचे पालन करेन. फडणवीस यांनी मला ज्या ज्या सूचना दिल्या आहेत, त्या मी पाळणार असल्याचे सांगितले.
