- आमदार सुधीरदादा गाडगीळ
- संभाव्य पूरग्रस्त भागाची पाहणी
सांगली / प्रतिनिधी
कोयना, वारणा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांना पूर आला आहे. दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने सांगलीला पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज संभाव्य पूरग्रस्त परिसराला भेट देत पाहणी केली. नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार गाडगीळ यांनी नागरिकांना केले. यावेळी जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका*महापालिका मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष🌊*वॉर रुम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष)* 🌊*दिनांक -19ऑगस्ट, 2025 *वेळ - 05pm वाजता**🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 23 फुट 04 इंच*🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट*🌊 कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी33 फुट10 इंच*🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 45 फूट व धोका पातळी 57 फूट*📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक*
7066040330 / 7066040331 / 7066040332मदत व बचावकार्य कक्ष🚒 अग्निशमन दल 🚒 *📞संपर्क क्रमांक*टिंबर एरिया, सांगली - 0233-2373333स्टेशन चौक, सांगली -0233-2325612कमानवेस, मिरज - 0233-2222610
आमदार गाडगीळ यांनी आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी नावेतून पाहणी केली. तसेच सरकारी घाट, विष्णू घाट, सांगलीवाडी, सूर्यवंशी प्लॉट परिसर आणि हरिपूर-कोथळी पुल येथील वारणा-कृष्णा संगमाची थेट पाहणी केली.“महापुराचे संकट पुन्हा डोक्यावर आहे. आपण सर्वांनी सतर्क राहावे, प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहेत.” यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, तहसीलदार सौ. अश्विनी वरुटे, सरपंच राजश्रीताई तांबवेकर, भाजप नेते अरविंद तांबवेकर, लोकप्कारतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

