- ९१ कुटुंबाचा समावेश
- पाणी पातळी ३६ फुटांवर
सांगली / प्रतिनिधी
कोयना, वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३६ फूट इतकी झाली आहे. परिणामी पुरपट्ट्यातील ९१ कुटुंबातील ४७१ नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमीतही पाणी शिरले आहे. येथील दहनविधी बंद करण्यात आले आहेत. कुपवाड येथील स्मशानभूमीमध्ये दहन करण्याची सोय करण्यात आली आहे.
यामध्ये सुर्यवंशी प्लाॅट ( कुटूंबे १५ नागरीक ८९), आरवाडे पार्क- (कुटूंबे २६ नागरीक १३८), कर्नाळ रोड पटवर्धन कॉलनी (कुटूंबे ५० नागरीक २४४) कुटुंब व नागरिकांचा समावेश आहे. सर्व नागरिकांनी खासगी ठिकाणी स्थलांतर केले आहे. महापालिकेच्या निवारा केंद्रात अजून एकही नागरिकाने आसरा घेतलेला नाही.
