yuva MAharashtra तर सामान्य करामध्ये १० टक्के सवलत

तर सामान्य करामध्ये १० टक्के सवलत

सांगली टाईम्स
By -



सांगली महापालिकेचा निर्णय
३० जून पर्यंत एकरकमी कर भरावा

सांगली / प्रतिनिधी

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ता धारकांनी ३० जुन २०२५ अखेर मालमत्ता कराचा संपुर्ण भरणा एक रक्कमी भरल्यास सामान्य करामध्ये १०% सवलत देण्यात येत आहे. सदरची रक्कम मिळकतधारक आगावू भरत आसल्याणे सामान्य करात सवलत देण्यात येत आहे.

तसेच आपल्या कराचा भरणा डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ट, युपीआय व ऑनलाईन स्वरुपात भरण्याची सोय महानगरपालिकेकडून केली आहे. तसेच आपणास प्राप्त झालेल्या मालमत्ता देयकामधील क्युआर कोड द्वारे भरना करु शकतात. जे मालमत्ता धारक आपल्या मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन स्वरुपात करत आहेत त्याना ग्रो ग्रिन या माध्यमातुन प्रत्येक बिलामध्ये र.रु.१० ची सवलत दिली जात आहे. आज अखेर ऑनलाईन व भरणा केंद्रावर ९९४८ इतक्या मिळकत धारकांनी सामन्य करात १०% सवलत घेवून रु.५ कोटी ६० लाख इतक्या रक्कमेचा कर भरलेला आहे. तरी आपल्या थकीत व चालू कराचा भरणा लवकरात लवकर मरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. ज्या मिळकत धारकांना आपल्या बिलाबाबत शंका असेल अशा मिळकत धारकांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा.

१. मालमत्ता कर विभाग, मंगलधाम इमारत, जिल्हापरिषदे समोर, सांगली,

२. घरपट्टी, विभागीय कार्यालय, मिरज.

३. घरपट्टी, कुपवाड विभागीय कार्यालय, कुपवाड.

मिळकत धारक एक रक्कमी बिल भरु शकत नसलेस अंशतः (पार्ट पेमेंट) भरुन घेण्याची सोय आहे. मात्र त्यावर सदर सवलत मिळू शकणार नाही. मात्र मुदतीत रक्कम भरली नाही तर सदर मागणी बिलामधील थकबाकी रक्कमेवर दर महा २% दंडाची आकारणी होईल. यासाठी सर्व मालमत्ता कर दात्यांनी ३० जून २०२५ अखेर कराची संपूर्ण रक्कम भरुन सामान्य करात १०% सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Tags: