◼️पालकमंत्र्यांकडून ११ जणांची नावे निश्चित
◼️ शासनाकडे मंजुरीसाठी सादर
सांगली / प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीचे ९ विशेष निमंत्रित व २ नामनिर्देशित सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केल्लेल्या काँग्रेड नेत्या जयश्रीताई पाटील व विट्याचे वैभव पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. निश्चित झालेल्या सदस्यांच्या नावाची यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.
सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य निवड रखडली होती. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनासह घटक पक्षांकडून जिल्हा नियोजन समितीवर जाण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. जिल्ह्यात भाजपचे आमदार सर्वाधिक असल्याने साहजिकच भाजपचे या समितीवर वर्चस्व राहील असे अपेक्षित होते. अखेर तसेच झाले आहे. विशेष निमंत्रित व नामनिर्देश सदस्यांची नावे अखेर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अंतिम केली आहेत.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जयश्रीताई पाटील, विट्याचे वैभव पाटील यांच्यसाह भारतीताई दिगडे, दीपक शिंदे, संग्राम देशमुख, सम्राट महाडिक (भाजप),
निशिकांत पाटील, पद्माकर जगदाळे (राष्टववादी काँग्रेस), समित कदम (जनसुराज्य पक्ष), अमोल यांचा (रयत क्रांती संघटना), राजेंद्र खरात (आरपीआय), आनंदराव पवार व तानाजी पाटील (शिवसेना) ही नावे जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रीत व विशेष निमंत्रित म्हणुन अंतिम करण्यात आली आहेत.
