yuva MAharashtra जयहिंद सेना महापालिका निवडणूक ताकदीने लढणार

जयहिंद सेना महापालिका निवडणूक ताकदीने लढणार

सांगली टाईम्स
By -

 

जयहिंद सेना पक्षप्रमुख श्री. चंदनदादा चव्हाण

◼️पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण 
◼️ उद्या वाढदिनी घोषणा करणार 
◼️ डॉ. देवीकुमार देसाई पॅटर्न राबविणार

सांगली । प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक जयहिंद सेना ताकदीने लढणार आहे. सर्वच प्रभागात सक्षम उमेदवार दिले जातील. स्वच्छता, पाणी, आरोग्य आणि शिक्षणावर भर देत सर्वसामान्यांना सोबत घेवून जयहिंद सेना महापालिकेचे मैदानात उतरणार असल्याची माहिती पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी दिली. दरम्यान गुंठेवारी चळवळ ते जयहिंद सेना अशा प्रवासाचा ३४५० पानांचा लेखाजोखा अल्बमच्या स्वरुपात नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान चव्हाण यांचा मंगळवार २७ मे रोजी वाढदिवस आहे. या निमीत्ताने महापालिका  निवडणूकीचे रणशिंग पुुंकले जाणार आहे. गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरु झालेला प्रवास जयहिंदे सेना या राजकिय पक्षापर्यंत येउन ठेपला आहे, असे सांगत पक्षप्रमुख चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य गुंठेवारीधारकांची होत असलेली गळचेपी लक्षात घेत गुंठेवारी संघर्ष चळवळ समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, उपोषण करत राज्यातील लाखो गुंठेवारीधारकांचे प्रश्न मार्गी लावले. गुंठेवारी हा शब्द शासनाच्या कोषात आणला. गुंठेवारी रहिवाशांचे सात बारा पत्रकी नावाची नोंद करण्यासाठी शासनाला भाग पाडले.

ADVT.

तब्बल ३० वर्षाच्या संघर्षातून १२ मार्च २०२५ रोजी जयहिंद सेना या पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यताही मिळाली असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणूकीत जयहिंद सेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार दिले जातील. सन १९७४ मध्ये सांगलीतील डॉ. देवीकुमार देसाई यांनी ज्या पध्दतीने सर्वसमाान्यांची वज्रमूठ बांधत प्रस्थापितांना धक्का देत नगरपालिकेवर सत्ता मिळवली होती. तोच पॅटर्न जयहिंद सेना येत्या निवडणूकीत राबविणार आहे. स्वच्छता, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत विकास असे मुद्दे घेत निवडणूकीला सामोरे जाणार आहे, असेही चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Tags: