◼️ प्रती दिन ३१२ रुपये हजेरी
◼️वर्षभर कामाची हमी
◼️मजूरांना दिलासा
सांगली । प्रतिनिधी
रोजगार हमी योजनेतून (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) जिल्ह्यात ११ हजारांवर कामे सुरु आहेत. यामध्ये सर्वाधिक ४ हजार ११२ घरकुलांच्या कामांचा समावेश आहे. मजूरांना प्रतीदिन ३१२ रुपयांची मजूरी देण्यात येते. दरम्यान जिल्हयात नोंदणीकृत मजूर कुटूंबाची संख्या ३ लाख २४ हजार ९१० इतकी आहे, तर केवळ मजूरांची संख्या ५ लाख ७६ हजार ९०० इतकी आहे. या सर्व मजूरांना जॉब कार्ड देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील मजूरांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणार्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते. हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याबरोबरच शाश्वत मत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
![]() |
| ADVT. |
सांगली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावी अमंलबजावणी सुरु आहे. योजनेंतर्गत मजूरांना वर्षभर रोजगाराची हमी देण्यात आली आहे. जिल्हयात नोंदणीकृत मजूर कुटूंबाची संख्या ३ लाख २४ हजार ९१० इतकी आहे, तर केवळ मजूरांची संख्या ५ लाख ७३ हजार ९०० इतकी आहे. या सर्व मजूरांना जॉब कार्ड देण्यात आली आहेत. दरम्यान या योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपा ११ हजार ११२ कामे सुरु आहेत. यामध्ये घरकुल, सिंचन विहीर, खेळाचे मैदान, रस्ते, वृक्ष लागवड, सरंक्षक भिंतीसह इतर कामांचा समावेश आहे. मजूरांना प्रतीदिन ३१२ रुपये इतकी मजूरी दिली जाते. प्रत्येक आठवड्याला मजूरीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते. वर्षभर काम मिळत असल्याने मजूरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सद्या मिळणार्या मजूरीमध्ये शासनाने वाढ करावी अशी मागणी मजूरांच्यामधून होत आहे.

