तासगाव / राजाराम गुरव
कवठेएकंद ता. तासगाव येथे गुरव समाज बांधव यांच्या वतीने मौंजीबंधन -व्रतबंध सोहळा उत्साहात पार पडला. कवठे एकंद येथील विरारसिद्ध मंदिरामध्ये हा उपनयन रतबंद संस्कार सोहळा संपन्न झाला.
जवळपास ३५ बटुंचा यामध्ये समावेश होता त्या कार्यक्रमासाठी गुरव समाजाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार गुरव ,श्रीधर गुरव सांगली जिल्हा गुरव समाज सेवाभावी संस्था सचिव व माजी सरपंच राजाराम गुरव, संचालक जगन्नाथ गुरव, शशिकांत निळकंठ गुरुजी उपस्थित होते. या यावेळी बटुंचे पालक, नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन हरिश गुरव, अनिकेत निळकंठ, रविंद्र गुरव, महादेव गुरव, उत्तम गुरव, नामदेव गुरव व गुरव समाज बांधव यांनी केले.
