yuva MAharashtra पाकिस्तानला जगाच्या नकाशातून नामशेष करा

पाकिस्तानला जगाच्या नकाशातून नामशेष करा

सांगली टाईम्स
By -

◼️ शिवसेना ज़िल्हाप्रमुख मेहेंद्र चंडाळे

◼️सांगलीत शिवसेनेच्या वतीने पहेलगाम हल्ल्याचा निषेध 

सांगली / प्रतिनिधी

पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तीस पर्यटकांचा मृत्यू तर १५ पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अतिरेकी हल्ल्याचा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून  तीव्र निषेध करण्यात आला.

     दरम्यान हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून पाकिस्तान च्या लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या वतीने असे हल्ले केले जात असल्याने, या जगाच्या नकाशातून पाकिस्तानचे नाव नामशेष करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  महेंद्र चंडाळे यांनी दिला. कलम ३७० हटवल्यानंतर काही संघटनांच्या कडून अशा तऱ्हेचे हल्ले केले जात असून यांना लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी संघटनेचा हात असून, प्रत्येक वेळी अशा हल्ल्यांमागे पाकिस्तानच असते. परंतु आमचा आमच्या कायदा सुव्यवस्थेसह पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्याना जशास तसे उत्तर देण्याचे काम आमचा भारत देश करेल.

दरम्यान पाकिस्तान ने जर अशा कारवाया थांबवल्या नाहीत तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला नामशेष करण्यात येईल. देशाचे पंतप्रधान संवेदनशील असून याच्यावर ताबडतोब कारवाई करतील. पाकिस्तान मध्ये जसे लष्कर ए तोयबा  ही संघटना काम करते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही लष्करी शिवबा अशी संघटना निर्माण करून सर्व शिवसैनिकांनी त्यामध्ये सहभागी होऊन पाकिस्तान सह बांगलादेशावर हल्ला करावा आणि त्यांना जशास तसे उत्तर द्यावे. अशी तीव्र प्रतिक्रियाही जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी पुढे बोलताना व्यक्त केलीय.

यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख रावसाहेब घेवारे, शिवसेना महिला संघटक सुनिता मोरे, रुक्मिणीताई आंबिगिरे, उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे, मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग, मिरज शहर प्रमुख किरणसिंह राजपूत, शहर प्रमुख संदीप ताटे, गजानन मोरे आदींसह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: