yuva MAharashtra उद्यापासून जुगाई देवीची यात्रा ; जय्यत तयारी

उद्यापासून जुगाई देवीची यात्रा ; जय्यत तयारी

सांगली टाईम्स
By -

येळवण जुगाई  / एस टी लष्कर 

श्री जुगाई लोळजाई येळवण जुगाई ( ता. शाहूवाडी ) च्या ग्रामदैवतेची चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला शनिवारी १२ रोजी प्रारंभ होत आहे. श्री जुगाई देवस्थान समिती, ग्रामपंचायत, मान मानकरी, पूजारी, ग्रामस्थाकडून यात्रेची जोरदार जय्यत तयारी सुरु आहे. श्री जुगाई लोळजाईच्या यात्रेसाठी कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी कर्नाटक कोकण सह हजारो भाविक भक्त यात्रेला येतात. येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी यात्रा कमिटी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. शाहुवाडीचे तहसिलदार, व पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शना खाली यात्रेचे नियोजन पूर्ण झालेले आहे.

जुगाई देवालयाच्या परिसरात फरशी बसविण्याचे काम चालू आहे .यात्रेसाठी देवालयाची, परिसराची स्वच्छता मंडप उभारणी विद्युत रोषणाईचे काम भाविक भक्तांसाठी दर्शन रांग, पिण्याचे पाणी, वहानतळ 'टूव्हीलर पार्कीग फोर व्हीलर पार्कीग आरोग्य सुविधा यात्रेतील खाद्य पदार्थ . खेळणी स्टॉल, गुलाल खोबरे नारळ विक्रते यांच्या दुकानाची शिस्तबद्द रचना यात्रा कमिटी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.

मानमानकरी, सासनकाठ्या पालखी मार्गातील अडथळे दूर करून यात्रा शांतते पार पाडण्यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष शरद कांबळे, उपाध्यक्ष विश्वास गुरव, ग्रामपंचायत सरपंच सत्यवान खेतल, उपसरपंच इस्माईल महात, श्री जुगाईचे पूजारी गुरव बंधू सर्व ग्रामस्य यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न शिल दिसत आहेत. यात्रेचा मुख्य दिवस चैत्र पौर्णिमा असल्यामूळे हस्त नक्षत्रावरती पालखी सोहळा होणार आहे असे पूजारी यांनी सांगितले. भाविक भक्तासाठी मलकापूर आगार, इस्लामपूर आगार व शिराळा आगारातून भक्तांच्या मागणी प्रमाणे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत . बांबवडे पैजारवाडी मॉर्निंग वॉक  यांच्या कडून अन्नछत्र ची व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags: