yuva MAharashtra तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै..!

तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै..!

सांगली टाईम्स
By -


◼️ - आमदार सुधीर मुनगंटीवार

मुंबई / प्रतिनधी 
तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं, परेशान हूं मै...या मासूम चित्रपटातील गाजलेल्या गीतांच्या ओळी उद्धृत करीत भाजपा जेष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विचारांना अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत वाट मोकळी करून दिली.काल माझ्या बोलण्यावर मिडीयाने सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपाला घरचा आहेर अशा मथळ्यात बातम्या दिल्या पण तसा मी नाराज नाही पम कघी असंही वाटतं तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै....या गाण्याच्या पंक्ति त्यांनी सभागृहात उद्घोषीत केल्या.  
 
चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यावर काही अधिकारी जाणूनबुजून अन्याय करतात असा आरोप त्यांनी केला.हे झारीतले शुक्राचार्य विकास गंगा आमच्या भागात पोहचू देत नाहीत.पण एका शुक्राचार्याला डोळा गमावावा लागला होता, आम्ही विदर्भाचे आहोत लक्षात ठेवा असा सणसणीत इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. काही उत्तम अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांची टिम तयार करा, काही चमको अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांना पायबंद घाला अशी सुचनाही त्यांनी केली.

आम्ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच नाही, तर राज्याच्या संसाधनांचा योग्य उपयोग व्हावा ही आपली भावना आहे.आपण विश्वस्त आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे काटकसर आणि आर्थिक शिस्त या गोष्टी ठिक आहेत पण जे जिल्हे दरडोई उत्पन्नात पुढे आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये. आमच्या विभागाकडेही लक्ष असू द्या असेही मुनगंटीवार म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्प विकासाला आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Tags: