yuva MAharashtra मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सवास सुरवात

मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सवास सुरवात

सांगली टाईम्स
By -

 


सांगली । प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय लावणी महोत्सव मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे सुरू झाला. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक संचालक संदीप बलखंडे, माजी कार्यक्रम अधिकारी मच्छिंद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, यांच्या मार्गदर्शनाखाली लावणी महोत्सव मिरज येथे दिनांक 1 ते 3 मार्च या कालावधीत बालगंधर्व  नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात राज्यातील विविध लावणी कलापथक आपली कला सादर करणार आहेत. स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक सुरेश आवटी यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा लावणी महोत्सव प्रेक्षकासाठी विनामूल्य असून याचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
Tags: