सांगली / प्रतिनिधी
जैन आधार फौंडेशन तर्फे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या मेळाव्याचे आयोजन कल्पवृक्ष गार्डन, जयसिंगपूर येथे दुपारी ३ वाजता कारण्यात आले आहे. जैन आर्थिक विकास महांडळाचे अध्यक्ष ललित गांधी, सामाजिक न्याय बाल संरक्षण परिषदेचे चेअरमन संदीप भंडारी यांची या मेळाव्यास उपस्थिती असेल. या मेळाव्यास जास्तीत जास्त जैन समाजबांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
जैन समाजाच्या सर्वांगीण विकास, उद्योजक, व्यापार, शैक्षणिक, अध्यात्मिक, समाजकार्य, महिला, मंदिरे व अशा समाजाच्या ज्वलंत विषयीयासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजामधील सर्व उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे, समाजकार्य व समाजातील लोकप्रतिनिधीही या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
