yuva MAharashtra कानिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक

कानिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक

सांगली टाईम्स
By -


◼️ प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन 
◼️ जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन

सांगली / प्रतिनिधी 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या विविध न्याय्य मागण्या शासनाकडून सोडविल्या जात नसल्याने सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व दहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासकीय, निमशासकीय, अर्धवेळ,विना अंशतः अनुदानित शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करावी, निवृत्त शिक्षकांना याचा लाभ देण्यात यावा,१०,२०,३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक संवर्गास लागू करावी,आय टी विषय शिक्षक समायोजन तात्काळ करावे,विना अट निवड श्रेणी द्यावी व इतर अनेक प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश भिसे, सचिव प्रा दिलीप जाधव, कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, उपाध्यक्ष प्रा धनपाल यादव, उपाध्यक्ष प्रा. पी व्ही जाधव, उपाध्यक्ष प्रा आर एस कदम, प्रा. एम डी ठोंबरे, सहसचिव प्रा. के जी तनंगी, मिलिंद खंडेलोटे, प्रा. व्ही बी भिलवडे, प्रा.प्आर जे लाड, प्रा शिवाजी कुकडे, प्रा संजय बाबर प्रा मनोहर शिंगाडे भरत नलवडे आदी जत आटपाडी कवठेमहांकाळ शिराळा तासगाव मिरज वाळवा खानापूर पलूस कडेगांव तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.

Tags: