yuva MAharashtra रेल्वे स्टेशन चौकात अंधाराचे साम्राज्य

रेल्वे स्टेशन चौकात अंधाराचे साम्राज्य

सांगली टाईम्स
By -

 


◼️नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा

सांगली । प्रतिनिधी
येथील वर्दळीचा चौक असलेल्या रेल्वे स्टेशन चौकामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रेल्वे स्टेशन, मार्केट यार्डकडे जाणार्‍या रस्त्यांना जोडणारा हा मुख्य चौक आहे. तरीही याकडे संबधित विभागाचे लक्ष नाही. वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेने तातडीने या चौकामध्ये पथदिव्यांची सोय करावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

रेल्वे स्टेशन चौक परिसरामध्ये अनेक मध्यमर्गीय, गोरगरीब कुटुूंबे आहेत. वडार, माकडवाले, कुंचीकोरवी समाज मोठ्या संख्येने राहतो. याशिवाय रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, शिंंदे पूलाकडे जाणारे रस्ते जोडणारा हा मुख्य चौक आहे. या चौकात दिवस-रात्र सातत्याने वाहनांची वर्दळ असते.

रेल्वे स्टेशनला जाणारी वाहणे, नागरिकांचा राबता असतो. याशिवाय मार्केट यार्डमधील जड वाहणांची येजा असते. कामगार, कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने वावरत असतो. या चौकामध्ये पथदिव्यांची सोय नाही. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. महापालिका प्रशासनाने तातडीने या चौकामध्ये पथदिव्यांची सोय करावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. 

Tags: