◼️अध्यक्ष रावसाहेब पाटील यांची माहिती
◼️ १२४० कोटींच्या ठेवी ; ९४३ कोटींचे कर्ज वाटप
◼️ शाखा विस्तार ७० पर्यन्त
सांगली । प्रतिनिधी
येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस नवीन २ शाखा विस्तारास नुकतीच मंजुरी मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली. कर्मवीर पतसंस्थेने एका पतसंस्थेचे विलीनीकरण करून घेतले. त्याबद्दल संस्थेला दोन शाखा नव्याने सुरु करणेस मंजुरी मिळाली. त्यातील एक शाखा गणेशनगर, सांगली येथे व दुसरी शाखा रुई ता. हातकणंगले येथे सुरु करण्यास मंजुरी मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, यापूर्वी मंजुर झालेल्या शाखा गोकुळ शिरगांव, उचगांव, कराड, वारणा-कोडोली या चार शाखासह एकूण सहा शाखा लवकरच सुरु करणार असून संस्थेचा शाखा विस्तार ७० शाखापर्यंत होईल. नवीन भागातील सभासदांचे जीवन कर्मवीर पतसंस्थेच्या विविध योजनांच्या माध्यमातून उंचावण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. त्याचा निधित आम्ही वापर करन पतसंस्थेचा नांवलौकीक वाढवू, सध्या पतसंस्थेच्या ठेवी १२४० कोटी असून रुपये ९४३ कोटीचे कर्जवाटप केले आहे.
संस्थेचा स्वनिधी १२० कोटीच्या पुढे आहे. संस्था अतिशय भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. एनएफ्टी, आरटीजीएस, क्युआर कोडसारखे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे, अॅड. एस. पी. मगदुम. डॉ. रमेश ढवू, ए. के. चौगुल, वसंतराव नवले, डॉ एस. बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, भारती चोपडे, चंदन केटकाळे, डॉ. नरेंद्र खाडे, लालासाहेब थोटे, अनिल मगदूम उपस्थित होते.
