yuva MAharashtra बंद कारखाने तपासणी मोहिम तातडीने पूर्ण करा

बंद कारखाने तपासणी मोहिम तातडीने पूर्ण करा

सांगली टाईम्स
By -
पालकमंत्री चंद्रकांत पाटील : टास्क फोर्सला सूचना ः अंमली पदार्थांच्या दुष्परिणाबाबात जनगागृती करा

सांगली / प्रतिनिधी
अंमली पदार्थांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंद कारखान्यांच्या तपासणी मोहिमेला गती द्या. मोहिम तातडीने पूर्ण करा. अमंली पदार्थांच्या दुष्परिणाबाबत जनजागृती करा. याबाबत माहिती सांगणारी लघुचित्रफित तयार करावी. प्रतिबंधक उपाययोजना कडक कराव्यात. कायद्याच्या चौकटीत राहून दोषींच्यावर कारवाई करावी असे आदेशपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील  बंद कारखाने तपासणी मोहिम तातडीने पूर्ण करावी. जे उद्योग बंद आहेत, ज्या उद्योगासाठी परवाना घेतला आहे तो उद्योगच तेथे सुरू आहे का याची तपासणी करून नियमांनुसार कार्यवाही करावी. कारवाई करण्यासंदर्भात काही अडचण येत असेल तर संबंधित विभागास कायद्यात सुधारणा करण्याबाबत कळवावे.
सांगली, मिरज शहरातील सीसीटीव्हे कॅमेरे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी. त्याच्या दुरूस्तीसाठी व अनुषंगिक कामाकासाठी अंदाजपत्रक तयार करावे जेणेकरून त्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल. शाळा, कॉलेजच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यावर बंदी आहे. याबाबत महानगरपालिका, नगरपालिका व संबंधितांनी तपासणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. विटा येथील पत्रकारांवर मारहान झालेल्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सांगून संबंधितांवर एमपीडीए लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटना व त्याअनुषंगाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

Tags: