निवडणूक बिनविरोध ; 'वसंतदादां'ची चौथी राजकारणात
सांगली / प्रतिनिधी
भाडेतत्वावर सुरु असलेल्या येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याच्या २१ संचालकापैकी तब्बल १९ संचालक नवे चेहरे आहेतं. तर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे पुत्र हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने वसंतदादाची चौथी पिढी कारखान्यात संचालक पदी विराजमान झाली.
वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे ३६ हजार सभासद आहेत. कारखान्याच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटातून प्रत्येकी तीन प्रमाणे पंधरा तर बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदासंघातून दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीचा एक, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून एक तर महिला गटातून दोन असे २१ संचालक निवडणूक द्यायचे होते.
बिनविरोध झालेले संचालक पुढीलप्रमाणे:
उत्पादक सह.संस्था:- खा. विशाल पाटील (सांगली). उत्पादक गट सांगली:- बाळासो पाटील (कळंबी), दिनकर साळुंखे (माधवनगर), हर्षवर्धन पाटील (सांगली). मिरज गट:- दौलतराव शिंदे (म्हैसाळ), शिवाजी कदम (शिरढोण), तानाजी पाटील (खंडेराजुरी). आष्टा गट- संजय पाटील (कवठेपिरान), ऋतुराज सूर्यवंशी (अंकलखोप), विशाल चौगुले (कसबेडिग्रज). भिलवडी गट:- यशवंतराव पाटील, गणपतराव सावंत-पाटील (सावंतपूर), अमित पाटील (येळावी). तासगाव गट:- अंकुश पाटील (बोरगाव), उमेश मोहिते (मांजर्डे), गजानन खुजट (तासगाव). अनुसूचित जाती, जमाती:- विशाल चंदूरकर (कवठेएकंद). महिला गट:- सुमित्रा खोत (हरिपूर) व शोभा पाटील (म्हैसाळ), इतर मागासवर्गीय:- अंजूम महात (सांगली), भटक्या विमुक्त जाती व जमाती:- प्रल्हाद गडदे (ब्रम्हनाळ).
त्यासाठी १४४ अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ३३ अर्ज अपात्र झाले होते. त्यानंतर अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत मंगळवारची होती. या मुदतीत खा. विशाल पाटील यांना सहकार्य करत २१ जागांसाठी २१ अर्ज राहिले. इतरांनी अर्ज माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
