![]() |
| परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देताना माजी आमदर नितीन शिंदे. |
◼️ माजी आमदार नितीन शिंदे
◼️ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी
सांगली / प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळ सांगली विभागाला १५० एसटी बसेस मिळाव्यात अशी अग्रही मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे मंत्रालयात त्यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेतली. सांगली आगाराकडे असलेल्या भंगार गाड्यांबाबत मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले.
ते म्हणाले, महामंडळात यापूर्वी दर चार वर्षांनी नवीन बसेसची बांधणी करून पुरवठा व्हायचा. त्याचे किलोमीटर दहा लाख व्हायचे. दहा लाख किलोमीटर पूर्ण व्हायचे त्या गाड्या स्क्रॅपला भंगारमध्ये काढून त्याचा लिलाव केला जातो. गेली दहा ते पंधरा वर्षात कोणती नवीन चेसिस किंवा बस बांधणी झालेली नाही. ज्या गाड्या आहेत त्या भंगारात घालण्याच्या लायकीच्या असलेल्या गाड्या आहेत.
अशा गाड्यांच्यामुळे चालक वाहक व प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. भंगार गाड्या आणि कमी गाड्या यामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. म्हणून सांगली विभागाला नवीन १४० ते १५० बस गाड्या द्याव्यात अशी मागणी मंत्री सरनाईक यांच्याकडे केली आहे.
