![]() |
| श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज |
सांगली / प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील श्रीराम मंदिर व श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिरात रविवारी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव सोहळा होणार आहे. या निमित्त किर्तन, जन्मकाळ पाळणा, आरती, महाप्रसाद,भजन आदी तसेच मोफत नेत्रतपासणी शिबीर आदी कार्यक्रम होणार आहेत.
पहाटे ५.३० वाजता काकड आरती होणार आहे. सकाळी दहा वाजता दीपक केळकर यांचे किर्तन होणार आहे. यानंतर ११.३० वाजता जन्मकाळ -पाळणा होणार आहे. महाप्रसादानंतर दुपारी १.३० वाजता नारायणी ग्रुप कोल्हापुर यांची भजन सेवा होणार आहे.
![]() |
| ADVT. |
यानंतर विवेकानंद फौंडेशन आणि ताराबाई परांजपे नेत्रपेढी यांच्यावतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर ९ ते दुपारी ४ यावेळेत होणार आहे. याचे उद्घाटन माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी प्रदीप सव्वाशे, संगीता सव्वाशे यांनी दिली.

