yuva MAharashtra 'माणगंगा ' च्या लढाईत आमदार पडळकरांची उडी

'माणगंगा ' च्या लढाईत आमदार पडळकरांची उडी

सांगली टाईम्स
By -
आटपाडी येथे माणगंगाचे शेतकरी, सभासद, कामगारांना मार्गदर्शन करताना भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर.

'माणगंगा बचाव कृती समिती' स्थापन; अध्यक्षपदी तानाजी लवटे

आटपाडी / प्रतिनिधी

आटपाडी तालुक्याची अस्मिता, राजकीय केंद्रबिंदू असलेल्या माणगंगा साखर कारखान्याच्या लढाईत आता जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडी घेतली आहे. माणगंगा बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे नेतृत्व तानाजी लवटे यांच्याकडे देण्यात आले आहे. दरम्यान हा लढा केवळ एका कारखान्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबांचा, त्यांच्या कष्टांच्या किंमतीचा आहे. हा लढा शेवटच्या टप्प्यापर्यंत लढला जाईल, अशी ग्वाही आमदार पडळकर यांनी यावेळी उपस्थित सभासदांना दिली.

माणगंगा कारखान्याच्या अनुषंगाने शनिवारी आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहात आटपाडी येथे बैठक पार पडली. याबाबत बोलताना पडळकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवं, मनातील वेदना आणि न्यायासाठीचा आक्रोश या बैठकीतून समोर आला. सभासदांनी आपल्या अडचणी, फसवणुकीच्या वेदना आणि कारखान्याच्या भविष्यासंबंधीची चिंता मांडली. या लढ्याला दिशा देण्यासाठी‘माणगंगा बचाव कृती समिती' स्थापन करण्यात आली असून तानाजी लवटे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

ADVT.

हा लढा केवळ एका कारखान्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबांचा, त्यांच्या कष्टांच्या किंमतीचा आहे. हा लढा शेवटच्या टप्प्यापर्यंत लढला जाईल. या मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक सभासदांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेला हा लढा, आता कुणीही थांबवू शकत नाही! हा संघर्ष आहे अस्तित्वाचा, न्यायाचा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याचा आहे. 

Tags: