![]() |
| (प्रतिकात्मक छायाचित्र) |
मुंबई / प्रतिनिधी
वारजे माळवाडी (पुणे) येथील एका युवकांने मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्म्यहत्या करण्याचा प्रयत्न केला. जाळी असल्याने त्याचा जीव वाचला. विजय परबती सास्ते असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. दरम्यान या घटनेमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली.
मंत्रालयात गाव खेड्यातील दररोज हजारो लोक समस्या घेऊन आपल्या कामासाठी येतात. आता सरकारने मंत्रालयातील प्रवेशासाठी नवीन नियम आणि अटी अधिक जाचक केल्या आहेत. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर एका तरूणाने चारच्या सुमारास मंत्रालयाच्या सातव्या माजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर बसविण्यात आलेल्या जाळीवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
विजय सास्ते असे त्याचे नाव आहे. तो वारजे माळवाडी पुणे येथून आला होता. त्याने सातव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर बांधलेल्या जाळीवर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उडी मारण्याचे समजतात पोलीस तत्काळ जाळीवर जाऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाहेर येत नव्हता. एका पोलिसाने त्या आपल्या पाठीवर घेतले आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तरूणाला नीटपणे उठताही येत नव्हते. तो आपल्या भूमिकेवर ठाम होता. दरम्यान सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालय दाखल केले.
