yuva MAharashtra आयुर्वेद प्रॅक्टिशनर्सच्या मागण्या प्राधान्याने पूर्ण करु

आयुर्वेद प्रॅक्टिशनर्सच्या मागण्या प्राधान्याने पूर्ण करु

सांगली टाईम्स
By -

 

सांगलीत मणके व मेंदू विकार राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसंगी करताना डॉ. रविशंकर परवाजे, डॉ. दिनेश के. एस., डॉ. प्रविण बी. एस., डॉ. मंगेश देशपांडे, डॉ. सुदीपकुमार, डॉ. जयेश बुरा व डॉ. योगेश शेटे.

आमदार सुधीर गाडगीळ; सांगलीत‘मणके व मेंदू विकार' राष्ट्रीय परिषद संपन्न  


सांगली । प्रतिनिधी
आयुर्वेद तत्वांचे पालन केले तर आपण निश्चितपणे निरोगी आरोग्य राखू शकतो आणि आजच्या काळात आयुर्वेद उपचारपध्दतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले. तसेच यापुढील काळातही आयुर्वेद प्रॅक्टीशनर्सच्या मागण्या शासनाकडे मांडून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही आमदार सुधार गाडगीळ यांनी आज येथे बोलताना दिली. सांगली, येथील आयुर्वेद व पंचकर्म प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत ते बोलत होते.
येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहामध्ये ही परिषद संपन्न झाली. मणके मेंदूविकार आणि आयुर्वेद उपचारपध्दती हा परिषदेचा विष होता. परिषदेच्या निमिताने तयार करल्या करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार सुधीर गाडगीळ तसेच सर्व मान्यवर वक्ते आणि पदाधिकार्‍यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभी दिपप्रज्वलनाने आणि धन्वंतरी पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी केंद्रीय मामुष मंत्री मा. प्रतापराव जाधव यांनी पाठविलेला व्हिडीओ संदेश प्रसारित करण्यात झाला. सांगलीसह महाराष्ट्र कर्नाटक हिधी या राज्यामध्ये कार्य करत असलेल्या आयुर्वेद-पंचकर्म प्रक्टीशनर्स असोसिएशनच्या कार्याबद्दल गौरोवोद्गार मंत्री श्री जाधव यांनी काढले.
केरळचे डॉ. दिनेश के. एस. यांचे ’लहाण मुलांतील मेंदूविका आणि आयुर्वेद उपचार’ या विषयावर व्याख्यान झाले. दुखत कर्नाटक - पुदूर येथील डॉ. रविशंकर परवाजे यांचे पक्षाघात (पॅरालिसिस) (पार्किन्सन्स) या विषयावर व्यारभान झाले. कंपवात या विषयावर डॉ. प्रविण बी. एस. यांचे व्याख्यान संपन्न झाले. डोंबिवलीचे डॉ. मंगेश देशपांडे यांचे मणक्याचे विकार आणि आयुर्वेद उपचार’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले. केरळच्या ए. व्ही. पी. या औषधनिर्माण कंपनीचे डॉ. सुदीपकुमार यांनीही आपले या विषयातील आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी स्वागत व प्रास्तविक अध्यरत डॉ. जयेश बुरा यांनी केले. या विषयावरील पेपर प्रेझेंटेशनचे नियोजन डॉ. श्रीधर सुगते, डॉ. स्वाती पाटील, डॉ. सुमित पाटील यांनी केले. 
पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन डॉ. प्राजक्ता सप्रे, डॉ. प्रतिक्षा तलवार यांनी केले. परिषदेचे संयोजन संचालक सचिव डॉ. महेश जंगम, संचालक डॉ. प्रमोद उपाध्ये, डॉ. जयप्रकाश सगरे, डॉ. अमोल पाटील, डॉ. अजिंक्य कोटेकर, डॉ. शक्तीशील पाटील, डॉ. अद्वैत वझे, डॉ. कोमल कुरकुटे, डॉ. शिवकांत पाटील, डॉ. प्रदिप ढवळे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सुमेधा रानडे, डॉ. तेजास्वनी कोंढेकर, डॉ. रश्मी शहा यांनी केले. शेवटी आमार उपाध्यक्ष डॉ. योगेश शेटे यांनी मानले.

Tags: