yuva MAharashtra मंदिरे धार्मिक संस्कृतीचा वारसा

मंदिरे धार्मिक संस्कृतीचा वारसा

सांगली टाईम्स
By -

 

करोली एम येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आमदार डॉ. सुरेश खाडे.

◼️आमदार डॉ. सुरेश खाडे
◼️करोली एम मध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरवात

सांगली / प्रतिनिधी 

मंदिरे ही धार्मिक संस्कृतीचा वारसा आहेत. ती जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी केले. करोली एम (ता. मिरज) येथे सुरु असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास त्यांनी भेट दिली.  

करोली एम येथे दरवर्षी महाशिवरात्री दिनी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरवात होते. सात दिवस भजन, कीर्तन आणि पारायण असे धार्मिक कार्यक्रम असतात. आमदार खाडे यांनी बुधवारी या सोहळ्यास भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. प्रवचनाचा लाभ घेतला. नियोजीत बांधकाम सूरू असलेल्या विठ्ठल रूक्मीणी मंदिराच्या जागेची पाहणी केली.यावेळी पारायणाचे वाचक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: