yuva MAharashtra शिवजयंती निमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर

शिवजयंती निमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर

सांगली टाईम्स
By -

 

श्री. संतोष पाटील 

◼️ डी. जी. पाटील प्रतिष्ठानतर्फे आयोजन
◼️ ३९५ मावळे करणार रक्तदान

सांगली / प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथील वारणा मंगल कार्यालयामध्ये महारक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वर्गीय खासदार डी. जी. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली. शिवाजी महाराजांची३९५ वी जयंती असल्यामुळे यावेळी किमान ३९५ मावळे रक्तदान करतील असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला.

याबाबत माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितले सध्या अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. रक्त वेळेत न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांची अडचण होते. काही वेळेला रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीवही दगावतो ही बाब लक्षात घेऊन शिवजयंतीचे औचित्य साधत प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास संबंधित रक्तपेढीच्या वतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्याचबरोबर डी.जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास छावा या चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाणार आहे. 

तरी सांगली शहर व परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम व्यक्त करावे असे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे ही आयोजन केलेले आहे. या शिबिरामध्ये कॅन्सर, डोळ्याचे, हाडाचे, पोटाचे, हृदयाचे व किडनीचे लिव्हरचे विकार लहान मुले महिला वयोवृद्ध पुरुष व विविध आजाराने त्रस्त असणाऱ्या नागरिकांची तज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासणी केली जाणार आहे तरी नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री संतोष पाटील यांनी केले आहे.

Tags: