yuva MAharashtra सांगलीत रविवारी राष्ट्रीय आयुर्वेद परिषद

सांगलीत रविवारी राष्ट्रीय आयुर्वेद परिषद

सांगली टाईम्स
By -


मणके आणि मेंदूविकारावर चर्चासत्रः नामवंत डॉक्टरांचा सहभाग

सांगली / प्रतिनिधी 

आयुर्वेद व पंचकर्म प्रॅक्टीशनर्स असोशिएशनच्या वतीने रविवार २३ फेब्रुवारी रोजी येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनच्या सभागृहामध्ये ‘मणके आणि मेंदू विकार' राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या परिषदेचा शुभारंभ होणार आहे. तर खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. देशभरातनू जवळपास पाचशेहून अधिक आयुर्वेद डॉक्टर, विद्यार्थी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे यंदाचे हे ६ वे वर्ष असल्याची माहिती आयुर्वेद व पंचकर्म प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयेश बुरा व उपाध्यक्ष डॉ. योगेश शेटे यांनी दिली.

डॉ. बुरा म्हणाले,आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार या उद्देशाने आयुर्वेद व पंचकर्म प्रॅक्टीशनर्स असोशिएशनची स्थापना करण्यात आली आहे. असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे सहावे वर्ष आहे. ‘मणके व मेंदूविकार’ हा परिषदेचा विषय आहे. रविवारी सकाळी साडे ९.३० वाजता केंद्रिय आयुष मंत्री केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते परिषदेस सुरवात होईलत्र सकाळी १०.३० वाजता डॉ. दिनेश के. एस. यांचे ‘लहान मुलांमधील मेंंदू विकार- निदान आणि उपचार’, सकाळी ११.३० वाजता डॉ. रविशंकर परांजपे यांचे ‘पक्षाघात’, दुपारी १२.३० वाजता डॉ. सुदेश कुमार यांचे ‘मणक्यांचे आजार आणि  आयुर्वेदीय उपचार’, दुपारी २.४५ वाजता डॉ. प्रविण बी. एस. यांचे ‘कंपवात व आयुर्वेदिय पंचकर्म उपचार’ तर सायंकाळी ४ वाजता डॉ. मंगेश देशपांडे यांचे ‘मणक्यांचे विविध आजार व उपचार’ या विषयांवर चर्चासत्र होणार आहे.

या परिषदेश देशभरातून ५००हून अधिक आयुर्वेद प्रॅक्टीशनर्स, प्राध्यापक, आयुर्वेद वैद्यक शाखेचे विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे सांगत डॉ. बुरा म्हणाले, सद्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनामध्ये मणक्याच्या आणि मज्जासंस्थेच्या आजारामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आयुर्वेदामध्ये प्रभावी उपचार पध्दती आहे. या संदर्भात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महेश जंगम यांच्यासह डॉ. जयप्रकाश सगरे, डॉ. प्रमोद उपाध्ये, डॉ. शिवकांत पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. विशाल चौगुले, डॉ. प्रदीप ढवळे आदी उपस्थित होते.