yuva MAharashtra सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी अशोक काकडे

सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी अशोक काकडे

सांगली टाईम्स
By -
नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे (भाप्रसे)

विद्यमान जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची बदली

सांगली / प्रतिनिधी

सांगलीचे विद्यमान जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची सिडकोच्या सहव्यवस्थापक पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काकडे यांनी नांदेड जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, सारथीचे व्यवस्थापकिय संचालक म्हणून यापूर्वी उठावदार कामगिरी केली आहे. 

सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मंगळवारी त्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.  डॉ. राजा दयानिधी यांनी प्रशासकीय कारभार गतिमान केला होता. पण त्यांच्या कार्यपद्धतीबाबत लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिकांच्या मध्ये नाराजी होती. काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीची मागणी केली होती. अखेर मंगळवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यांच्या रिक्त जागी आयएएस अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


Tags: