yuva MAharashtra अपघातात पोलिस हवालदार ठार

अपघातात पोलिस हवालदार ठार

सांगली टाईम्स
By -


मृत सम्राट कदम

सांगली ते मिरज रस्त्यावरील घटना ; कुत्रे आडवे गेल्याने अपघात

सांगली / प्रतिनिधी

सांगली ते मिरज रस्त्यावरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोरील रस्त्यावर कुत्रे गाडीच्या आडवे आल्याने झालेल्या अपघातात पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम (वय ४०, रा सुभाषनगर मिरज) हे ठार झाले. तर, दुचाकी चालक प्रकाश तातोबा संपकाळ हे जखमी झाले.मृत कदम पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

जखमी प्रकाश संपकाळ हा त्यांचा मेव्हणा आहे. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते मेव्हणा प्रकाश यांच्या दुचाकीवरून (एम एच १० बी.एफ ४५७७)  सांगलीकडे जात होते. यावेळी सिद्धी विनायकहॉस्पिटल समोर ते आले असता अचानक एक कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलीकडे पडले. यावेळी समोरून वेगात आलेल्या मोटारीने त्यांच्या डोक्याला ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दुचाकी चालक प्रकाश संपकाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

सम्राट कदम यांनी वीस वर्षे पोलिस दलात सेवा केली होती. कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पोलीसांनी दुचाकीचालक प्रकाश संपकाळ (रा. कवठपिरान, ता. मिरज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गांधी चौक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags: