yuva MAharashtra सांगलीत दोन दिवस ग्रंथ महोत्सव

सांगलीत दोन दिवस ग्रंथ महोत्सव

सांगली टाईम्स
By -

सोमवार, मंगळवारी आयोजन; ग्रंथदिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली / प्रतिनिधी
ग्रंथ संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार २४ फेबु्रवारी व मंगळवार २५ फेबु्रवारी रोजी सांगली ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अशोक काकडे तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सपे्र यांच्यासह सर्व लोकप्रबतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून दोन दिवस चर्चासत्र, परिसंवाद, कवीसंमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे यांनी पत्रकार बैठकित दिली.
ते म्हणाले, सोमवारी सकाळी 8 वाजता स्टेशन चौकपासून ग्रंथदिंडी निघेल. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेखा जाधव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उदघाटन होईल. दुपारी दोन वाजता ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ हा अरुण नाईक यांचा दिलखुलास गप्पा, साडे तीन वाजता साहित्य, सोशल मिडीया आणि मुले या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. अनिल मडके, रघुराज मेटकरी, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. कालीदास पाटील सहभागी होणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थित असेल. तिसरे सत्र मध्ये माय मराठी वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हयात 343 सार्वजनिक ग्रथांलये
जिल्हयांमध्ये 343 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. यामध्ये अ, ब, क व ड अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये क वर्गात १८, ब वर्गामध्ये ९१, क वर्गामध्ये १६७ तर ड वर्गामधील ६७ सार्वजनिक ग्रंथालयांचा समावेश आहे. या ग्रंथोत्सव महोत्सवामध्ये सर्व ग्रंथालयाचे प्रतिनिधी, सांगली शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शासकिय खात्यातील अधिकारी, कर्मचारी, प्रकाशक, ग्र्रंथविक्रेते मोठया संख्येने या ग्रंथोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत, असेही जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोनवणे यांनी सांगितले.
मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता चला संकल्प करुया वाचनाचा यावर महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चिंतामणी सहस्त्रबुध्दे, मोहन गायकवाड (जिल्हाधिकारी, प्राथमिक शिक्षण), आप्पासाहेब मासुले संध्या यादव व जीवन सर्वोदय हे सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता हसत खेळत विज्ञान या प्रयोगशील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता काव्यधारा या कवितांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडे तीन वाजता भारतीय संविधान ः आपले भविष्य या विषयांवर प्रा. निरंजन फरांदे यांचे व्याख्यान तर सायंकाळी पाच वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जेष्ठ विचारवंत डॉ. गौतमीपुत्र कांबळे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विक्रमसिंह कदम उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

Tags: