मूर्तीवर आजपासून संवर्धन प्रक्रिया; पुरातत्व विभागाकडून शुक्रवारपर्यंत होणार काम; चार दिवस कासव चौकात उत्सवमूर्ती, कलश दर्शन
कोल्हापूर / प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून चार दिवस बंद राहणार आहे. मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांकडून मंगळवार, दि. २१ पासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. २४ जानेवारीपर्यंत संवर्धनाचे हे काम सुरू राहणार असल्याचे देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले. दरम्यान मूळ मूर्तीचे दर्शन जरी होणार नसले तरी भाविकांना कासव चौकात उत्सवमूर्ती आणि कलश दर्शन करता येणार आहे.
वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थानची मूळ मूर्ती सुस्थितीत राहावी याकरिता देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुरातत्व विभागाला मूर्तीची पाहणी करण्याबाबत कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभाग, दिल्ली व पुरातत्त्व विभाग, पुणे येथील तज्ज्ञांकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनंतर पुरातत्त्व विभागाने मूर्तीच्या संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल दिला होता.
या अहवालानुसार देवस्थान व्यवस्थापन समिती मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांना जानेवारी रोजी पत्र दिले होते. त्यानुसार भारतीरय पुरातत्त्व विभागाचे दिल्लीतील अधिकाऱ्यांनी १९ जानेवारीला मूर्तीची पाहणी केली. यानंतर पुरातत्त्व विभागाच्या दिल्ली व पुणे येथील अधिकाऱ्यांनी देवस्थान व्यवस्थापन समिर्त सहायक संचालक पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडील अधिकाऱ्यांनी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि जोतिबा डोंगरावरील गावकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून मंगळवार (दि. २१ ते शुक्रवार (दि. २४) या चार दिवसांत मूर्तीवर रासायनिक संर्वधन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुरातत्त्व विभागाकडू मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही.
