yuva MAharashtra वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा

सांगली टाईम्स
By -

पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी; सांगलीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद


सांगली / प्रतिनिधी
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालायचा असे तर प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहतूक पोलीसांना मदत करावी असे आवाहन सांगली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत वाहतूक शाखेच्या वतीने आज रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील यांनीही या शिबिरास भेट दिली. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सद्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे. वाहतुकीचे नियम, सुरक्षा याबाबत नागरिकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. 
दरम्यान वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी वाहतूक शाखेकडे कार्यरत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवडे, कार्याध्यक्ष राजेश छाजेड,महेश साळुंखे, सांगली शहर युवक अध्यक्ष किशोर जगदाळे, पवन कदम, इत्यादी उपस्थित होते.
Tags: