प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात संस्थेच्या लेझिम पथकाचा आवाज घुमणार
सांगली / प्रतिनिधी
प्रजासत्ताकदिनी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनासाठी सांगली शिक्षण संस्थेच्या लेझीम पथकाची निवड झाली आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह शि. वा. गोसावी, श्रीराम कुलकर्णी, विजय भिडे, प्रसाद जोग, नितीन खाडीलकर विपिन कुलकर्णी यांनी दिली. यामुळे संस्थेच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र क्रीडा भारतीतर्फे हा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. त्यामध्ये १६ माजी विद्यार्थिनी, चार विद्यार्थी, पाच वादक असा एकूण २५ व्यक्तींचा सहभाग आहे. विद्यार्थिनी अशा : संपदा जोशी, श्रावणी गाडगीळ, अनुश्री विसपुते, उर्वी कान्हेरे, केतकी बावडेकर, साक्षी पारेख, मृण्मयी फडके, वेदश्री दांडेकर, पूर्वा कुलकर्णी, समृद्धी बेलवलकर, आर्या जोशी, मुक्ता लिमये, साक्षी अजेटराव, अस्मिता शिंदे, संस्कृती बेलवलकर, तेजस्विनी सत्तीकर. विद्यार्थी असे : विनायक येडके, मिथेश माने, विवेक पाटील. वादक - मधुरा लिमये, ज्ञानेश लिमये, शंतनू ताम्हणकर, किशोर माने. संघप्रमुख - हरिहर भिडे. व्यवस्थापक - सचिन गद्रे. प्रजासत्ताक संचलनामध्ये सहभाग हा शिक्षण संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
