yuva MAharashtra संविधानाची प्रत देत प्रजासत्ताक दीन साजरा

संविधानाची प्रत देत प्रजासत्ताक दीन साजरा

सांगली टाईम्स
By -

 

सांगलीत प्रजासत्ताक दिनी उपस्थितांना संविधानाची प्रत देताना आण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे.

सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात प्रजासत्ताक दीन विविध उपक्रमांमध्ये सजरा करण्यात आला. येथील टिंबर एरिया असोसिएशनच्या कार्यालयात प्रजासत्ताक दीन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अण्णा लोकसेवा फौंडेशनच्या वतीने उपस्थितांना संविधानाच्या प्रतचे वाटप करण्यात आले. फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

शहरातील टिंबर असोसिएशनच्या वतीने ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. असोसिएशनच्या कार्यालयात उपाध्यक्ष नंदकुमार माळी यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. माळी यांचा सामाजिक कार्यकर्ते, अण्णा लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष अशोक अण्णा मासाळे यांच्याहस्ते संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र मुळीक, बाबुभाई पटेल, सांगली अर्बन बँकेचे शाखाधिकारी श्री दप्तरदार, श्री चितळे, यशवंत माळी यांच्यासह टिम्बर एरियातील व्यापारी, परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: