आयजी दत्तात्रय कराळे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
सांगली / प्रतिनिधी
दहशतवाद विरोधी पथक, नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय काम करत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना अतिउत्कृष्ठ सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. आयपीएस कराळे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. ही सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
कराळे मूळचे एरंडोली (ता. मिरज) येथील आहेत. सद्या गव्हर्मेंट कॉलनी येथे राहतात. त्यांचे वडीलही पोलीस दलात होते. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. यापूर्वी त्यांना सन २००३ साली युनोचे शांती पदक तसेच आंतरराष्ट्रीय सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. स्मार्ट पोलिसिंग ही आयजी कराळे यांची ख्याती आहे. मुंबईतील अत्यंत संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस कमिशनर म्हणून त्यांनी दिमाखदार कामगिरी केली आहे. याशिवाय दहशतवाद विरोधी पथक, नक्षलग्रस्त भागात तसेच भारतीय पोलिसी सेवेतुन "युनो" च्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवला आहे.
![]() |
| ADVT. |
नक्षलग्रस्त भागातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल त्यांना पोलीस पदक आणि पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालेले आहे. सन २०१३ साली महामाहीम राष्ट्रपतीच्या हस्ते पोलीस सेवेतील महत्वाच्या पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिना निमित त्यांना पुनःश्च हा राष्ट्रीय स्तरावरील मोठा सन्मान मिळालेला आहे. सामान्य कुटुंबातील एक मुलगा केवळ अभ्यास करून आपले व आपल्या परिसराचे जीवनमान बदलू शकतो ही प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व अशी आयजी कराळे यांची ओळख आहे.

