yuva MAharashtra राज्य स्तरीय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत सांगलीचा डंका

राज्य स्तरीय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत सांगलीचा डंका

सांगली टाईम्स
By -
राज्यस्तरीय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना आमदार रोहित आर.आर.पाटील. बाजूस विजय भगत व अन्य.


तिन्ही विभागात सांगली जिल्हा प्रथम; खेळाडूंना शासकीय पुरस्कारासाठी प्रयत्न करणार
  सांगली / प्रतिनिधी 
तासगाव येथील कै. आर.आर.आबा पाटील तालुका क्रीड़ा संकुल येथे पार पडलेल्या १४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्यूनियर व कैडेट मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत १४ वर्षे मूलांच्या गटात सांगली जिल्हा संघाने प्रथम क्रमांक चषक, बुलढाणा संघ द्वितीय,जालना संघ तृतीय व अहिल्यानगर जिल्हा संघ चतुर्थ स्थानी राहिला. तर मूलींच्या गटात सांगली शहर संघ प्रथम,सांगली ग्रामीण जिल्हा संघ द्वितीय चषक मानकारी ठरले. १२ वर्षे गटात मूलांच्या स्पर्धेत सांगली शहर संघाने मुंबई संघाचा १२ धावानी पराभव करत विजेते पद पटकावले तर अनुक्रमे मुंबई , पुणे व सातारा संघ द्वितीय , तृतीय व चतुर्थ क्रमांकावर राहिले.
   स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील व राष्ट्रीय महासचिव दुलीचंद मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विजय भगत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पै. लक्ष्मण मंडले, उपाध्यक्ष श्री.योगेश पाटील, कोषाध्यक्ष प्रवीण पाटील, संचालक सुमित गायकवाड़, सचिन पाटील, कांतिलाल परदेशी,नीलेश साळुंखे, नरेश बोहरे, विकास पाटील,अक्षय पाटील व सर्व जिल्हा प्रतिनिधि उपस्थित होते.
   स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या हस्ते विजेत्या संघाना चषक प्रदान करण्यात आले. मोंटेक्स बॉल क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय व सर्व स्तरावर खेळला जाणारा खेळ असुन या खेलाडूना परिक्षेमधे वाढीव गुण व शासकीय पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करनार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.
  वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखान्याचे संचालक अमित पाटील, अभिजीत पाटील, नगरसेवक बाळासाहेब सावंत, सचिव अमोल कदम, संचालक संजय पांढरे, ॲड. खुजट, ॲड. कुंभार व जिल्हा संघटनेचे सर्व संचालक तथा सदस्य उपस्थित होते. सूत्र संचालन अमोल कदम यांनी केले, तर प्रवीण पाटील यांनी आभार मानले.
Tags: