yuva MAharashtra मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

सांगली टाईम्स
By -

जनसुराज्य पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांचा सत्कार करताना डॉ. महेशकुमार कांबळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, बाळासाहेब गोंधळे. बाजूस सफाई कर्मचारी.







समीत कदम; १२०० कर्मचाऱ्यांना दिलासा ; कर्मचाऱ्यांकडून सत्कार

सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडे कार्यरत असणाऱ्या १२०० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना अखेर स्थगिती मिळाली आहे. जनसुराज्य पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेत फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी बदल्यांना स्थागितीचे आदेश मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी काढले आहेत. दरम्यान यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कर्मचाऱ्यांनी कदम यांचा त्यांच्या निवासस्थानी जात सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

महापालिकेकडे कायम, मानधन तसेच बदली असे १२०० सफाई कर्मचारी आहेत. गत महिन्यात आयुक्त गुप्ता यांनी सरसकट कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सांगलीचे मिरजेला, मिरजेचे कुपवाड, सांगलीत तर काही कर्मचाऱ्यांच्या सांगलीवाडी येथे बडल्या करण्यात आल्या. कामाच्या दृष्टीने बदली गैरसोयीची झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला होता. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. महेश कांबळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, बाळासाहेब गोंधळेसह कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवला. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही याबाबत आयुक्तांना पत्र दिले होते. भाजपचे पदाधिकारी सूरज पवार यांनी यासाठी प्रयत्न केले होते. 
दरम्यान कर्मचारी घटनांनी या बाबत जनसुराज्याचे समीत कदम यांनीही साकडे घातले होते. कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेत कदम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनी तात्काळ बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात कदम, कर्मचारी पदाधिकारी, डॉ. महेश कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांची आयुक्त दालनात बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याची ग्वाही आयुक्त गुप्ता यांनी दिली. त्यानुसार आदेश काढण्यात आले. दरम्यान यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कर्मचाऱ्यांनी कदम यांच्या निवासस्थानी जात त्यांचा सत्कार केला. त्यांचे आभार मानले.