![]() |
| ह. भ. प. संजय कोटणीस महाराज |
महाराष्ट्र वारकरी परिषदेकडून निवड; सर्व स्तरातून अभिनंदन
सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र वारकरी आचारसंहिता परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुखपदी ह.भ.प. संजय कोटणीस यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र वारकरी आचारसंहिता परिषदेचे मुख्य प्रवर्तक निलेश झरेगांवकर यांनी ही निवड जाहीर केली.
त्यांच्यावर वारकरी आचारसंहिता महाराष्ट्र यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोटणीस हे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच त्यांना विद्यावाचस्पती पदवीने सन्मानीत करण्यात आले. १९९५ पासून कोटणीस यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, भागवत कथा, रामकथा, संत चरित्रे यावर किर्तन, व्याख्यान, प्रवचन सेवेला सुरुवात केली.
