भाजप नितीन गडकरीसह या 11 खासदारांना बजवणार नोटीस, कारण…
लोकसभेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. परंतु या वेळी व्हिप जारी करुन भारतीय जनता पक्षाचे ११ खासदार गैरहजर होते. तसेच एनडीएचे जनसेनाचे बालाशौरी वल्लभानेनी गैरहजर होते. आता पक्ष या गैरहजर राहणाऱ्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. त्यानंतर त्यांचे उत्तर आल्यावर निर्णय घेणार आहे.
वन नेशन-वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले तेव्हा समर्थनासाठी 269 मते मिळाली. त्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकार साधारण बहुमत मिळवू शकले नाही. मग दोन तृतांश बहुमत कसे मिळवणार आहे.