yuva MAharashtra १९४ पाणंद रस्त्यांच्या नोंदी, ३५० शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, २२१० जातीचे दाखले वाटप

१९४ पाणंद रस्त्यांच्या नोंदी, ३५० शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, २२१० जातीचे दाखले वाटप

सांगली टाईम्स
By -



- रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची

- सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी

 सांगली / प्रतिनिधी

सेवा पंधरवडा अंतर्गत सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन व अतिक्रमणमुक्ती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सांगली अपर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील ५ महसूल मंडळांतील २९ गावांमध्ये शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन व अतिक्रमणमुक्ती मोहिम राबविण्यात आली असल्याचे अपर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 या उपक्रमांतर्गत एकूण १९४ पाणंद रस्त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. ३५० शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले,  शेतीवर जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून घेण्यासाठी १० संमतीपत्रे प्राप्त झाली, 28 शेतरस्त्यांचे  सीमांकन करण्यात आले, शेतरस्त्यांची ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली, एकूण ५ रस्ता अदालती घेण्यात आल्या, १६४ रस्त्यांचा विशिष्ट सांकेतांक निश्चित करण्यात आला. भटक्या व विमुक्त जाती जमाती दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये नंदीवाले १४३, वडर १५२१, रामोशी २०६, मरीआई २९, मदारी १२३, गारुडी १७३, कुणबी १५ असे एकूण २२१० जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

या मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत कायदेशीर, सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे तसेच महसू‌ल अभिलेखांमध्ये शिवार रस्त्यांची नोंद, क्रमांकिकरण व सीमांकनाव्दारे पारदर्शकता निर्माण करणे हा आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत जाण्यासाठी स्थायी, कायदेशीर आणि अडथळामुक्त रस्ते उपलब्ध झाले आहेत. महसूल अभिलेखांमध्ये सुधारणा होऊन गाव नकाशे, प्रपत्र ३/१ फ आणि नोंदणी अभिलेख अधिक अचूक झाले आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून, शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


Tags: