yuva MAharashtra 'महिला आयोग' बुधवारी सांगली जिल्ह्यात

'महिला आयोग' बुधवारी सांगली जिल्ह्यात

सांगली टाईम्स
By -



महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या 
रुपाली चाकणकर यांचे आवाहन

 

मुंबई / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारीया उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात बुधवार दि. १५ आँक्टोबर२०२५ रोजी जनसुनावणी होणार असूनआयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालयसांगली येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यातअसे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

'महिला आयोग आपल्या दारीया उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणेसुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणेआर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिसप्रशासनविधी सल्लागारसमुपदेशकजिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारीहा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर दि. १५ आँक्टोबर२०२५ रोजी सांगली जिल्ह्यात असणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासनपोलीसकामगारपरिवहनआरोग्यशिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.



Tags: