yuva MAharashtra पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'प्रदूषण' कडून १ कोटींचा निधी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'प्रदूषण' कडून १ कोटींचा निधी

सांगली टाईम्स
By -



मुंबई / प्रतिनिधी

मराठवाड्यात पूर स्थितीने नागरिकांचे अतोनात नुकसान केले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शासनाने मदतीचा हात दिला आहे. याशिवाय राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील मदतीचा हात दिला आहे. मदतीसाठी तब्बल १ कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता राज्यभरातील अनेक संस्थांकडून मदतीचे ओघ सुरू असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी जी शिंदे ,मा. श्री. अजितदादा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री मा. श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थित आज मंत्रालयात सुपूर्द केल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले. 

दरम्यान या कठीण काळात शेतकरी बांधवांसोबत उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी असून आपण सर्वांनी शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊया; आर्थिक मदतीचा हातभार लावूया असे आवाहनही कदम यांनी केले आहे. 


Tags: