yuva MAharashtra ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली टाईम्स
By -

- अर्ज भरण्यासाठी मोफत सोय

सांगली / प्रतिनिधी

ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य नोंदणी अभियानस सांगलीत मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमांतर्गत राज्यभरातील ऑटोरिक्षा चालक बांधव स्वयंस्फूर्तीने कल्याणकारी मंडळाचे अर्ज सादर करून वार्षिक ₹800/- शुल्क भरून सदस्यत्व स्वीकारत आहेत. याकरिता ऑनलाइन फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, राज्य अध्यक्ष महेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ स्वयंसेवी पद्धतीने ऑटोचालकांना मोफत फॉर्म भरण्यास मदत करत आहे.सांगली जिल्हातील ऑटोरिक्षा चालक बांधवांना संयुक्त महासंघाच्या वतीने मोफत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

यावेळी ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्य अध्यक्ष महेश चौगुले यांनी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी ,सांगली यांची भेट घेऊन  रिक्षा कल्याणकारी मंडळाचे ऑनलाईन अर्ज तात्काळ अँप्रोल करावेत म्हणून यावेळी विनंती केली. संयुक्त महासंघाच्या विनंतीस प्राधान्य देत साहेबांनी सांगितले की, “ऑटो चालकांचे ऑनलाईन अर्ज तात्काळ मंजूर करण्यात येईल. तेंव्हा जास्तीत जास्त ऑटो चालकांने कल्याणकारी मंडळाचे अर्ज सादर करावेत. जेणेकरून भविष्यात रिक्षा कल्याणकारी योजनेचा फायदा घेण्यास पात्र होता येईल..! यावेळी महेश चौगुले, प्रकाश चव्हाण ,श्रीकांत कुस्कर ,राजू नदाफ, आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: